पूर्वी प्रियकर-प्रेयसी एकमेकांना कबुतराच्या माध्यमातून प्रेमपत्र पाठवायचे. ग्रिटींग्ज, गिफ्ट सारख्या माध्यमातून आपल्या भावना एकमेकांना व्यक्त करीत होते.
सध्याच्या डिजिटल युगात SMS, व्हिडिओ कॉल सारख्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करायचे. मात्र आता काळ खूप पुढे गेला आहे.
नव्या जमान्यात संपर्क साधण्याची नवनवी माध्यमे उपलब्ध होत आहेत. मात्र हाय टेक मेसेजिंगच्या काळातही काही जण नोटांवर ‘प्रिय’ व्यक्तीसाठी विशेष संदेश लिहितात.
काही महिन्यांपूर्वी ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा मजकूर असलेल्या एका नोटेचा फोटा व्हायरल झाला होता. त्याने काही दिवस धुमाकूळ घातला होता.
यानंतर आता आणखी एका नोटेचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र हा मजकूर थोड्या वेगळ्या स्वरुपाचा आहे. प्रियकराला साद घालण्यासाठी प्रेयसीने अनोखा मार्ग निवडला आहे.
तिने चक्क एका २० रुपयांच्या नोटेवर तिच्या प्रियकारासाठी ‘विशेष प्रेम संदेश’ लिहिला आहे. या प्रेयसीचे लवकरच लग्न होणार आहे. मात्र तिला प्रियकरासोबत पळून जायचे आहे.
त्यामुळे पळवून नेण्यासाठी प्रेयसीने प्रियकराला साद घातली आहे. त्यासाठी तिने २० रुपयांच्या नोटवर एक खास संदेश लिहिला आहे.
‘प्रिय दीपूजी, २६ एप्रिलला माझं लग्न आहे. मला तुमच्यासोबत पळवून न्या. तुमची पुष्पा. आय लव्ह यू,’ असा मजकूर नोटेवर आहे.
पुष्पा नावाच्या एका तरुणीचा २६ एप्रिलला विवाह होणार आहे. मात्र तिला विवाह करायचा नाही.
तिला तिचा प्रियकर दीपूसोबत पळून जायचे आहे, ही गोष्ट २० रुपयांच्या नोटेवरील मजकुरामुळे स्पष्ट झाली आहे.
आता या प्रेमकहाणी बद्दल कोणाला काही माहीत नाही. या प्रकरणाचा शेवट कसा होणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
मात्र तो व ती काय पाऊल उचलतात हे कोणालाही ठाऊक नाही. परंतू सध्या इंटरनेटवर ही २० रुपयांची नोट चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर ती जोरदार व्हायरल झाली आहे.