कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी नकार दिला तर ‘यांचा’ नंबर लागणार?

245

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या राष्ट्रीय पक्षाला ‘अध्यक्ष’ मिळणेही महाकठीण झाले आहे. 

राहुल गांधीं यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाचा पेच निर्माण झाला होता, तो निकाली लागेपर्यंत सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा या पदाची सूत्रं तात्पुरती आपल्या हाती घेतली.

सोनिया गांधी, प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्यात खुर्चीचा खेळ सुरु आहे. पण अध्यक्ष व्हायला राहुल गांधी तयार नाहीत, तेव्हा त्यांनी नकार दिला तर कोण? याचे उत्तर अखेर मिळाले आहे.

त्यानंतर अनेक बैठका झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाला आपला अध्यक्ष ‘फायनल’ करता आलेला नाही. राहुल गांधी यांचे मन वळवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न वाया गेले आहेत.

अशोक गेहलोत यांना मागच्या वर्षीही काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा विचार समोर आला होता. परंतु, खुद्द गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत जाण्याचा प्रस्ताव नाकारल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सध्याही, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भर देत आहेत.

पक्षाच्या नाजूक संकटात राजस्थानचे मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे काँग्रेस नेते अशोक गेहलोत हे या पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली जाऊ शकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशोक गेहलोत यांना राजस्थानातून दिल्लीला बोलावून ‘अध्यक्ष’ पदाची जबाबदारी देण्याचा पर्याय योग्य असल्याचचे काँग्रेसच्या एका गटाचे म्हणणे आहे.

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही पक्षाला स्थायी अध्यक्षाची गरज असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे, हे पद सोनिया गांधीनी काँग्रेसच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे सोपविण्याची शक्यता आहे.

जर सोनिया गांधी यांनी पक्ष सावरण्यासाठी अशोक गहलोत यांना सूचना केली तर ते नाकारणार नाहीत, राहुल गांधी यांनी नकार दिला तर ते पद स्वीकारतील असे बोलले जात आहे.

अशोक गेहलोत गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. सोनिया गांधी यांचाही गेहलोत यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा नकार गेहलोत यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

कारण राजस्थानच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ‘तरुण नेतृत्व’ म्हणून सचिन पायलट यांच्यावर सोपवण्याऐवजी ‘अनुभवी’ अशोक गेहलोत यांच्यावरच सोपवण्यात आली तेव्हाही ही गोष्ट स्पष्ट झाली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here