Rahul Gandhi’s Pushups on Stage : राहुल गांधींचे मंचावर पुशअप्स | सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

182
Rahul Gandhi's pushups on stage

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी इथे दाखल झाले आहेत. राहुल गांधी तीन दिवसांच्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत.

सोमवारी सकाळीच ते कन्याकुमारीमध्ये एका रोड शोमध्येही सहभागी झालेले दिसले. यावेळी, राहुल गांधींनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षांवरही निशाणा साधला.

तमिळ संस्कृती आणि तमिळ लोकांचं प्रतिनिधित्व करणाराच तामिळनाडूमध्ये राज करेल, असंही राहुल गांधींनी यावेळी म्हटलंय. त्यानंतर राहुल गांधी यांनी ‘सेंट जोसेफ मॅट्रिक्युलेशन हायस्कूल’च्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसंच या विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी हे अतिशय मोकळेपणाने मंचावरदेखील थिरकले.

इतकंच नाही तर राहुल गांधी यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्टेजवरच पुशअप्सदेखील केले. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल माडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

राहुल गांधींना एका विद्यार्थ्यांना पुशअप्स करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसोबत मंचावरच पुशअप्स केले. या व्हिडिओत राहुल गांधी यांनी ९ सेकंदात नॉनस्टॉप १३ पुशअप्स केलेले दिसत आहेत.

विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी एकिडोमध्येही सहभागी झाले. राहुल गांधींचा हा अंदाज अनेकांना आपल्याकडे आकर्षित करणारा ठरला.

अनेकांनी राहुल गांधींचा हा खेळकर मूड आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या दरम्यान विद्यार्थ्यांनीही राहुल गांधींच्या या खेळकर स्वभावाचा नव्यानंच अनुभव घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here