राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले | कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

173

नागपूर : उपराजधानीला हादरवून टाकणाऱ्या राणे कुटुंबीयांच्या आत्महत्येचे गूढ तब्बल चार महिन्यांनंतर समोर आले आहे.

या प्रकरणात डॉ. सुषमा राणे (४०) यांनी पती डॉ. धीरज राणे (४५), ध्रुव (वय ११) व वण्या (वय ५) यांना कुत्र्याचे इंजेक्शन देऊन त्यांचा खून केल्यानंतर स्वत: गळफास लावल्याचे निष्पन्न झाले आहे.

पतीच्या सततच्या संशयातूनच डॉ. सुषमा राणे यांनी टोकाची भूमिका घेतल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जगनाडे ले-आऊटमध्ये राहणाऱ्या डॉक्टर पती-पत्नींनी दोन मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here