रंगराव पाटील खाजगी आडत बाजार तर्फे नाफेड अंतर्गत तूर ऑनलाईन नोंदणी सुरु

198

उदगीर येथील रंगराव पाटील खाजगी आडत बाजार, लोणी उदगीर येथे नाफेड अंतर्गत हमीभाव योजनेत तुरीच्या खरेदीसाठी दि.२८ डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

तरी तूर ऊत्पादक शेतकऱ्यांनी नोदंणी करावी, असे आवाहन रंगराव पाटील खाजगी आडत बाजार तर्फे करण्यात आले आहे.

यावर्षी पीएसएस २०२०-२१ अंतर्गत नाफेड व महा एफपीसी अंतर्गत शासकीय हमीभाव योजने अंतर्गत तूर खरेदी करण्यात येणार आहे.

त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजे आहे. तूर ६००० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे.

नोंदणीसाठी 7/12, पिकपेरा, बँक पासबुक व आधारकार्ड आवश्यक आहे.

तरी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन  रंगराव पाटील खाजगी आडत बाजार तर्फे अनिरुद्ध गुरुडे, बाालाजी पाटील व भास्कर पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here