अल्पवयीन मुलांकडून वर्गातील मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्‍कार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती

812
Annoying! 5-year-old Chimurdi raped by man, strangled to death

सातारा : जावळी तालुक्यातील इयत्ता 9 वीमध्ये शिकणार्‍या एका 14 वर्षाच्या मुलीवर तिच्याचं वर्गमित्रांनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या दोन अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही मुलगी गरोदर राहिल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वर्गातील अल्पवयीन मुलांनी तिला चाकूचा धाक दाखवत वारंवार बलात्कार केला आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पीडित, अल्पवयीन मुलीने मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्या दोघा अल्पवयीन मुलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांना साताऱ्यातील बालगृह आणि रिमांड होममध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील एक 14 वर्षाची मुलगी आपल्या कुटूंबासह शेतात राहत होती. तिच्याचं वर्गात शिकणारी दोन मुले शेतात अल्पवयीन मुलीच्या घरी आली. घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी तिच्यावर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला.

सदरील अत्याचार मोबाईलमध्ये व्हीडीओ शुटींग केले. त्यानंतर हा व्हीडीओ सगळ्यांना दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

शेतातील घरात कोणीच नसल्याचा गैरफायदा घेत दोन्ही अल्पवयीन मुलांनी सलग एका महिन्यापेक्षा अधिक काळ तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

या सततच्या अत्याचाराने अल्पवयीन मुलगी सतत भीतीच्या सावटाखाली वावरत होती. जेव्हा मुलीचे पोट दुखू लागले तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून पाहिले असता, ती सात महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ही खळबळजनक घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.

तेव्हा पोलिसांना तक्रारीनुसार अधिक तपास केला. तेव्हा पोलिसांना आढळून आले की, एकाच वर्गात शिकणार्‍या दोन मुलांनी पिडीत मुलीवर सतत बलात्कार केला आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना तात्काळ ताब्यात घेऊन सातारा येथील बालसुधारात दाखल केले आहे.

या संदर्भात मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, इम्रान मेटकरी, पद्मश्री घोरपडे व रफिक शेख हे करीत आहेत.

हे देखील वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here