आपल्या हाताचे ऑपरेशन असल्यामुळे गावाकडील ओळखीच्या तरुणीला पुण्यामध्ये मदतीला बोलावले.
दरम्यानच्या काळात जवळीकता वाढवून तिच्यावर बलात्कार केला.
त्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ देखील तयार केले आणि ब्लॅकमेल सुरू केले.
ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एका बावीस वर्षाच्या तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने 2018 मध्ये फिर्यादीला हाताचे ऑपरेशन असल्याचे सांगून मदत करण्यासाठी म्हणून पुण्यात आणले होते.
त्यानंतर तिला पुण्यातील मित्रांच्या रूमवर घेऊन जात बलात्कार केला.
त्याचे व्हिडिओ तयार केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखविले.
तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
व्हिडीओची धमकी देत तिच्याकडून पंधरा हजार रुपये ही आरोपीने घेतले होते.
दरम्यान हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला तर ठार मारेल.
हा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी आरोपी करून वारंवार पीडित तरुणीला दिली जात होते.
या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने अखेर पोलिसात तक्रार दिली.