नवी दिल्ली: केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी काल धक्कादायक विधान केलं. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला होता.
राव साहेब यांचा यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल. दानवे यांचे डोके फिरल्याचे लक्षण आहे.’ अशी घणाघाती टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
तसेच हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणे गरजेचे आहे अशा शब्दात बच्चू कडू यांनी दानवेंवर टीका प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणे शेतकऱ्यांचा अपमान आहे.
गेल्या १४ दिवसापासून कृषी सुधारणा कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा देण्यात आला आहे.
मात्र भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असा धक्कादायक दावा केला होता.