लातूर जिल्ह्यात 1065 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 90 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 419 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये 62 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26378 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 932 आहे.
लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 715 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24731 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 49 आहे.
राज्यात आज 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, मुंबईतही रुग्णांचा आकडा वाढताच, आज 1 हजार 646 रुग्ण आढळले, मागील 24 तासात 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 448 कोरोना रुग्णांची नोंद
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 448 कोरोना रुग्णांची नोंद. आज 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 41 हजार 731 वर.
कोरोनाच्या धर्तीवर परभणी जिल्ह्यातील निर्बंधाना मुदतवाढ
जिल्ह्यातील कोरोना चा संसर्ग वाढत असल्याने पालकमंत्री नवाब मलिक यांनी दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात घालुन दिलेले विविध निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत.
ज्यामध्ये जिल्हाभरातील सर्व धार्मिक स्थळ 31 मार्च पर्यंत बंद असणार आहेत विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून होणारी वाहतूक ही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आठवडी बाजार ही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा : पालकमंत्री अशोक चव्हाण
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्ह्यामध्ये काही निर्बंध लागू होत असून, पुढील काळात लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियम पाळण्याची आवश्यकता आहे.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.