सरकारी नोकरीची सुवर्णसंधी | UCIL मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती

373

नवी दिल्ली : सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. वर्षातील पहिली भरती जाहिरात केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत येणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) ने दिली आहे. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

इच्छुक उमेदवार यूसीआयएलचे अधिकृत संकेतस्थळ ucil.gov.in ला भेट देऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात आणि २० मार्च २०२१ पर्यंत हे अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत आहे.

यूसीआयएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जॉब सेक्शनमध्ये उपलब्ध केलेल्या भरतीच्या जाहिरातीवर क्लिक करून अधिसूचना आणि अर्जाचे प्रारुप उमेदवार डाऊनलोड करू शकतात. हा अर्ज संपूर्ण भरून, विचारलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रतींसह सोबत अर्ज शुल्काच्या (५०० रुपये) डिमांड ड्राफ्टसह अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

या पदांसाठी आहे नोकरभरती

 • डीजीएम / चीफ मॅनेजर – मेडिकल सर्व्हिसेस – ४ पदे
 • चीफ सुप्रींटेंडेंट / अॅडिशनल सुप्रींटेंडेंट / डेप्युटी सुप्रींटेंडेंट – सिविल – ४ पदे
 • चीफ मॅनेजर / मॅनेजर / अॅडिशनल मॅनेजर / डेप्युटी मॅनेजर / असिस्टंट मॅनेजर – अकाउंट्स – ७ पदे
 • कंट्रोलर ऑफ स्टोर्स / अॅडिशनल कंट्रोलर ऑफ स्टोर्स – १ पद
 • चीफ सुप्रीटेंडंट / अॅडिशनल सुप्रीटेंडंट / असिस्टंट सुप्रीटेंडंट – माइंस – ११ पदे
 • अॅडिशनल मॅजेनर / डेप्युटी मॅनेजर – पर्सोनेल – १ पद
 • अॅडिशनल सुप्रींटेंडेंट / डेप्युटी सुप्रीटेंडंट – मिल – १ पद
 • अॅडिशनल सुप्रींटेंडेंट / डेप्युटी सुप्रीटेंडंट – इंस्ट.– १ पद
 • अॅडिशनल सुप्रींटेंडेंट / डेप्युटी सुप्रीटेंडंट – सर्वे– १ पद
 • डेप्युटी मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर – सिक्युरिटी – ३ पदे
 • डेप्युटी कंट्रोलर ऑफ पर्चेस / असिस्टंट कंट्रोलर ऑफ पर्चेस – १ पद
 • असिस्टेंट मॅनेजर – सीएस / असिस्टंट मॅनेजर – पर्सोनेल – १ पद
 • सुपरवाइजर केमिकल – ७ पदे
 • सुपरवाइजर सिविल – २ पदे
 • फोरमन मेकेनिकल – ३ पदे
 • सेक. असिस्टंट – सी – २ पदे
 • अधिकृत संकेतस्थळ ucil.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here