LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड | 14 लाखांपर्यंतचे पॅकेज, शेवटची तारीख ३१ डिसेंबर

217

LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे.

मॅनेजमेंट ट्रेनीपासून  असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. 

जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल  तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे.

पदे – 
मॅनेजमेंट ट्रेनी – ९
असिस्टंट मॅनेजर – ११

अर्ज कसा कराल? 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पुढे दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिट लिस्टच्या आधारेच सरळ भरती केली जाणार आहे.

LICHFL Job Notification पाहण्यासाठी इथे क्लिक करा…

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here