रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेला अटक | अटकेनंतर पोलीस बोठेची खास बडदास्त ठेवत असल्याचा आरोप

237
Rekha Jare murder accused Bal Bothe arrested

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली.

या प्रकरणात फरार असलेल्या बोठेला तब्बल साडेतीन महिन्यांनंतर काल अटक करण्यात आली. सकाळी त्याला हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सुपे पोलिस ठाण्यात आणून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याला लपून बसण्यासाठी मदत करणारा हैदराबाद येथील वकील जनार्दन चंद्रप्पा यालाही अटक करण्यात आली आहे.

रेखा जरे हत्याकांड :

  • रेखा जरे हत्याकांड : बोठेच्या अडचणी वाढल्या | पारनेर न्यायालयात पोलिसांचा ‘ असा ‘ अर्ज

मात्र अटकेनंतरही या दोघांची पोलिसांकडून बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप जरे यांनी केला आहे. बाळ बोठे याला अटकेनंतर बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप जरे यांचा मुलगा रुणाल यांनी केला आहे. ‘

या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करू,’ असा इशाराही जरे यांनी दिला आहे. बोठे याला आज पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

जरे यांनी म्हटले आहे की, ‘आरोपीला अटक केल्याबद्दल पोलिसांचे आभार. मात्र, बोठे हा आरोपी आहे की सरकारचा पाहुणा? अशी शंका घेण्यासारखे पोलिसांचे वर्तन आहे.

  • रेखा जरे हत्याकांड | खून आणि विनयभंगानंतर बाळ बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

त्याला हैदराबादहून आणताना तिरंगा ध्वज लावलेल्या अलिशान मोटारीतून आणण्यात आले. त्याच्यासाठी पारनेरला स्वतंत्र कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला बेड्याही घालण्यात आलेल्या नाहीत.

एवढे नीच कृत्य करणाऱ्या आरोपीला तिरंगा झेंडा लावलेल्या वाहनातून आणणे ही सहन न होणारी आणि संशयास्पद गोष्ट आहे. जरे यांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणूनही याचा खेद वाटतो.

Rekha Jare Murder

या प्रकाराची ४८ तासांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आपण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत. राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे आपण यासंबंधी तक्रार करणार आहोत,’ असेही जरे यांनी सांगितले.

बोठे याला शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तेथून सरळ पारनेला मोटारीने आणण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी करून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

त्या पोलिसांना निलंबित करा- Adv. लगड

बोठे याची बडदास्त ठेवणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे वकील Adv. सुरेश लगड यांनीही केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगड यांनी पत्र पाठविले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ‘खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची बडदास्त ठेवणाऱ्या पोलीसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. बोठेची एवढी बडदास्त कशासाठी? पोलीसांची बोठेच्या तपासासाठी सहा सहा पथके पाठवुनही अखेर त्यास आलीशान कारमधून का आणले.

त्याची कायद्याच्या पलीकडे जाऊन ठेप का ठेवली जात आहे. याला जबाबदार असणाऱ्या पोलिसांविरूदध कारवाई करण्यात यावी,’ असेही Adv. लगड यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here