रेखा जरे हत्या प्रकरण : ‘माझ्या आईचा त्याने अनेकदा मानसिक व शारीरिक छळ केला’

221

नगर : पत्रकार बाळ बोठे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने व त्याने आधीच आमचे कुटुंब संपवून टाकण्याची भाषा केलेली असल्याने त्याच्यापासून अथवा हस्तकांपासून आमच्या जीवाला धोका आहे.

आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला बोठे हाच जबाबदार राहील. आम्हाला पोलिस संरक्षण देण्यात यावे’, अशी मागणी हत्याकांडात मयत झालेल्या  रेखा जरे यांचा मुलगा कुणाल याने केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘पत्रकार बाळासाहेब जगन्नाथ बोठे याचे आमच्या घरी येणे-जाणे असायचे. माझ्या आईचा त्याने अनेकदा मानसिक व शारीरिक छळ केला आहे. तिला तो जीवे मारण्याची धमकी देत असे.

तुला किंवा तुझ्या मुलांना ठार करीन, अशी धमकी देत असे. त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कोणी त्याच्या विरोधात बोलत नव्हतो.

यापूर्वी माझ्या आईने त्याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात अर्ज दिले आहेत. आईच्या खून प्रकरणातील आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. त्यांचा सूत्रधार बोठे असल्याचे समोर आले आहे.’

ही घटना घडली तेव्हा माझी आजी सिंधुताई आणि धाकटा भाऊ कुणाल सोबत होते. ते या घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

पत्रकार बाळ बोठे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने व त्याने आधीच आमचे कुटुंब संपवून टाकण्याची भाषा केलेली असल्याने त्याच्यापासून अथवा हस्तकांपासून आमच्या जीवाला धोका आहे.

आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला बोठे हाच जबाबदार राहील. आम्हाला पोलिस संरक्षण देण्यात यावे.’ असेही निवेदनात म्हटले आहे.

जामिनावर ११ डिसेंबरला सुनावणी

जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार  पत्रकार  बाळ ज.  बोठे  याच्या अटकपूर्व जामिनावर ११ डिसेंबरला जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांना नोटीस काढत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील सुनावणी ११ डिसेंबरला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here