रेखा जरे खून प्रकरण | पोलीस शोधत होते ‘बाळ बोठे’ हाती लागला फरारी डॉ. निलेश शेळके

198

अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याचा शोध घेत असतांना पोलिसांना गेल्या अडीज वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके सापडला आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी पुणे येथून ताब्यात घेतले असल्याचे समजते.

फरारी आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा हा डॉक्टर ‘निकटवर्तीय’ मानला जातो. बोठे याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाच्या हाती हा डॉक्टर लागला असल्याने रेखा जरे हत्याकांड प्रकरणात देखील याचा काही सहभाग आहे का? याचीही चौकशी होणार आहे . 

अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या बोगस कर्जवाटप प्रकरणात शेळके याच्यावर सप्टेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून शेळके पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान पोलीस २० ते २२ दिवसांपासून फरार बोठे याचा शोध घेत आहेत.

याच डॉक्टरच्या विरोधात बोगस कागदपत्रांच्या आधारे शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा अपहार करून घेऊन बँकेला गंडा घातला आहे.

यासोबतच पत्नीचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे. ३० नोव्हेंबरला रेखा जरे यांचा खून झाल्यानंतर काही आरोपीना अटक होताच बाळ बोठे हा फरार झाला आहे.

२३ दिवसांपासून फरार असलेल्या बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी आता विविध मार्गांनी फास आवळला आहे. त्याच दरम्यान पोलिसांना पुणे येथून खात्रीशीर माहिती मिळाली.

तेव्हा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात जाऊन डॉ. निलेश शेळके यास अटक केली. याच डॉक्टरच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्याप्रकरणात त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.

डॉ. निलेश शेळके याच्यावर नगरमध्ये सुरू केलेल्या एका मोठ्या रुग्णालयासाठी शहर सहकारी बँकेकडून त्याने कर्ज घेतले.

शहर सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्‍टरांच्या नावाने कर्ज घेत त्या रकमेचा अपहार केला. या प्रकरणी दोन महिलांसह एकूण तीन डॉक्‍टरांनी प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे, डॉ. श्रीखंडे यांनी फिर्याद दिली होती. त्यामुळे या प्रकरणातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी डॉक्टरने सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केले.

मात्र यश आले नाही. जामीन फेटाळला असतानाही तो पोलिसांना गुंगार देत बराच काळ फरार होता. अखेर या गुन्ह्याचा तपास करताना तो पोलिसांच्या हाती लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here