मुंबई : लग्नानंतर नवरा-बायकोंमध्ये किती अंतर असावं यावर ज्याची त्याची वेगवेगळी मतं आहेत. मात्र हे अंतर जास्त असून नये, असं अनेक जण सांगतात.
मिलिंदनं वयाच्या 52 व्या वर्षी 26 वर्षांच्या अंकितासोबत लग्न केलं. त्यानंतर त्याला अनेकदा ट्रोलिंग सहन करावी लागली आहे.
मिलिंदनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अंकितासोबतच्या नात्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
जोडीदारांमधील वयाच्या अंतराचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधावर (Relationship) होतो, असा एक मतप्रवाह आहे. अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता यांच्यात तब्बल 26 वर्षांचं अंतर आहे.
मिलिंदनं काय सांगितलं?
‘कमी वयाचा ‘लाईफ पार्टनर’ असल्यामुळे त्याचा तुमच्याशी प्रामाणिक राहण्यावर फरक पडतो का?’ असा प्रश्न मिलिंदला विचारण्यात आला होता.
त्यावेळी ‘प्रामाणिकपणाचा थेट संबंध तुमचा समंजसपणा आणि विचार याच्याशी आहे. शारीरिक जवळीकतेशी याचा काही संबंध नाही. तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, यावर हे अवलंबून असतं,’ असं मिलिंदनं सांगितलं.
“नात्याचा सेक्सशी काही संबंध नाही. सेक्स महत्त्वपूर्ण आहे, असे मला वाटत नाही. तुमचं नातं जे आहे, ते महत्त्वाचं असतं.
तुमच्या मधील भाविनक नातं काय आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. एखाद्या नात्यामध्ये या गोष्टी नसतील तर ते नातं नसतं’ असं मिलिंदनं स्पष्ट केलं आहे.
इमोशनल सपोर्ट आवश्यक
मिलिंद हा विषय स्पष्ट करताना पुढं म्हणाला, “ तुमचं सेक्स लाईफ चांगलं असलं तरी तुमचं परस्परांमधील नातं खराब असू शकतं. इमोशनल सपोर्ट नसेल तर लोकं मोडून पडतात हे मी पाहिलं आहे’’, असं मिलिंदनं सांगितलं.
मिलिंद सोशल मीडियावर सक्रीय
मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. हे दोघंही त्यांचे फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
पण त्यांचं लग्न आणि लव्हस्टोरी याच्याबद्दल सर्वांनाच एक वेगळं आकर्षण आहे. 2018 मध्ये हे कपल लग्नाच्या बेडीत अडकले, मात्र त्याआधी 2014 पासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते.