मुंबई: देशातील लोकप्रिय रियलिटी शो इंडियन आयडॉल 12 कायम वादात राहिले आहे.
या रियलिटी शोमध्ये कायम काहीतरी वेगळे घडवून स्पर्धकांच्या कथा रंगवल्या जात असल्याचा आरोप केला जातो.
या शो बद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे, हा शो सुरू झाल्यापासून अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्यातील संबंधांची चर्चा सर्वत्र घडवली घेली आहे.
त्यांच्या नात्याला शोच्या निर्मात्यांनी लव्ह अँगल दिला होता. त्याच्या अँगलवर सोशल मीडियावर टीकाही झाली, पण शेवटी या दोघांच्या गोड आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विशेष गोष्ट म्हणजे हा शो आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यानंतर पवनदीपने अरुणितासोबत रंगीबेरंगी चर्चा संपली आहे.
पवनदीपने त्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पवनदीप म्हणाला, ‘अरुणिता आणि माझ्यामध्ये प्रेमाचा कोणताही पैलू नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.
आम्ही खूप वेळ एकत्र घालवतो. आम्हा सर्व स्पर्धकांचे एकमेकांशी घनिष्ट मैत्रीचे संबंध आहेत’.
तो पुढे म्हणाला की, ‘वेळ आल्यावर प्रत्येकाला सत्य कळेल. माझ्या आणि अरुणितामध्ये मैत्रीशिवाय काहीच नाही.
आता आपल्याला फक्त आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
या सर्व गोष्टींनंतरही प्रेम कायम राहील; असे म्हणत पवनदीप अरुणितासोबतच्या नात्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पार्श्वगायनासाठी तयार
वास्तविक, पवनदीप 2015 मध्ये ‘द व्हॉइस’ शोचा विजेता होता.
आता इंडियन आयडॉलमध्ये येण्याचे कारण जिंकणे नव्हते तर काहीतरी नवीन शिकणे होते.
आता पवनदीपला खात्री आहे की तो पार्श्वगायनासाठी तयार आहे.
हे देखील वाचा
- अबू आझमी समर्थकांनी बर्थ डे रॅली काढली अन् तलवार बाळगली | आमदार अबू आझमींवर गुन्हा दाखल
- प्रियकरासाठी पतीचा घेतला जीव; पत्नीने मंगळसूत्र देखील गहाण ठेवून दिली एक लाखाची सुपारी दिली!
- शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता आज होणार जमा; १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ