नात्याला कलंक : तीन लेकरांची आई भाच्यासोबत पळून गेली; पकडले गेल्यावर भलतेच घडले!

1111

नवी दिल्ली : प्रेम आंधळे असते तसे ते नात्यांची मर्यादा ओलांडून नको ते करून बसते.

कामातुर व्यक्तीला नाती दिसत नाहीत, त्यांना फक्त वासना खुणावत असते. या सर्व भानगडीत काही प्रेम प्रकरणांची काही हटके उदाहरणे ही सातत्याने समोर येत असतात.

नात्याला काळिमा फासणारी व डोकं सुन्न करणारी अजब घटना झारखंडमध्ये घडली आहे. आपल्या तीन लेकरांना सोडून काकु चक्क भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मात्र काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि पोलिसांनी त्यांना पकडले. काकीने पकडले गेल्यावर चक्क पतीला सोडून भाच्यासोबतचं लग्न करण्याचा हट्ट धरला.

मात्र कुटुंब आणि गावकरी यांच्या भीतीने भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या काकीने त्यांच्यावरच लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या बाजीतपूर गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं तिच्या भाच्यावर प्रेम होतं. 25 वर्षीय मुलगा त्याच्या 35 वर्षीय काकीच्या प्रेमात पडला.

त्यानंतर गेले कित्येक दिवस या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. महिलेला तीन लहान मुलं आहेत. एक आठवड्यापूर्वी हे दोघेही पळून गेले. त्यानंतर महिलेच्या पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करून आपल्या भाच्याविरोधात कारवाईची मागणी केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना या दोघांचा शोध लागला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांना दोघांची माहिती मिळाली.

काकी आणि तिचा भाचा हे दोघेही जमालपूरमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आणि समजावून घरी परत आणले.

घरी परत आल्यानंतर महिला पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्यासाठी अडून बसली. तिने आपल्या प्रेम प्रकरणाची कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या भीतीमुळे भाच्याने लग्न करण्यास नकार दिला.

आपले काकीसोबत कोणतेही संबंध नसल्याचे म्हटले, हे ऐकल्यावर काकी संतप्त झाली. तिने भाच्यावरच फसवणुकीचा आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आपल्याला याने जबरस्तीने पळवून नेले असे देखील म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here