नवनाथ गायकवाड मित्रमंडळाचे कार्य उल्लेखनीय : मुख्याधिकारी भारत राठोड

336

उदगीर : लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे.

समाजातील गरजू व गरिब लोकांना इतर समाजबांधवानी व सामाजिक संघटनांनी मदत करण्याची गरज आहे.

विविध समाजातील प्रतिकुल परिस्थितीत जगणाऱ्या गरजू लोकांना मदतीचा हात देऊन नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळाने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

नवनाथ गायकवाड यांचे हे आदर्श कार्य इतर संघटनांनी अनुकरण करण्याची आवश्यकता आहे; असे मत उदगीर नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड यांनी व्यक्त केले.

मागील वर्षभरापासुन या लॉकडाऊनच्या काळात नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून गरजवंत विधवा महिलांना, सफाई कामगारांना व पोलीस कर्मचार्‍यांना मास्क, सेनिटायझर, फेसशिल्ड, अन्नधान्यांचे किट, कोरोना योद्धांचा सन्मान, डॉक्टरांचा सन्मान, परिचारिका सन्मान, रक्तदान शिबिर असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळानी एक आदर्श उभा केला आहे.

पवित्र महिना समजला जाणारा रमजान ईदच्या निमित्त उदगीर नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड व नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड यांच्या शुभहस्ते नगर परिषद येथील कंत्राटदार कर्मचाऱ्यांना अन्नधान्याच्या किटचे व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी अजीमभाई दायमी, जानीभाई शेख, धनाजी बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशील सूर्यवंशी, दयानंद पाटील, गिरीष स्वामी, गोविंद कांबळे, मनीष मुळे यांच्यासह नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here