पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 चा आढावा
लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2020-21 चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह इतर सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2020-21 अंतर्गत जिल्ह्याला मंजूर असलेला निधी व Covid-19 अंतर्गत खर्च झालेला निधीचा संबंधित कार्यान्वयीन यंत्रणाकडून आढावा घेण्यात आला.