रितेश देशमुख व जेनेलियाची पूल पार्टी | ‘टोटल धमाल’च्या ‘पैसा ये पैसा’ या गाण्यावर रितेशचा ‘झक्कास डान्स’

230
Ritesh Deshmukh

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रितेशने पोस्ट केल्या केल्या ती व्हायरल होते. आत्ताही त्याचा एक पूल पार्टीचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय.

या व्हिडीओत रितेश देशमुख, पत्नी जेनेलिया व मित्रांसोबत ‘टोटल धमाल’च्या ‘पैसा ये पैसा’ या गाण्यावर थिरकताना दिसतोय. (Riteish Deshmukh and Genelia’s pool party)Ritehsh Party

स्वीमिंग पूलच्या काठावर डान्स करता करता अचानक रितेशच्या एका मैत्रिणीचा पाय घसरतो आणि ती पूलमध्ये पडते. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात रितेशही पूलमध्ये पडतो. मग काय, सगळेच खो-खो हसतात.

रितेशच्या या पूल पार्टीचा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. केवळ काही तासांत चार लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तेवढ्याच लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश  आणि जेनेलिया  या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले.

याशिवाय रितेशने एका पांडाचा व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत पांडा एक पाय वर उचलताना दिसतोय. बॅकग्राऊंडमध्ये ‘आजा करें गोविंदा का डान्स, टांग उठा के’ हे मजेदार गाणे ऐकू येतेय. हा व्हिडीओ शेअर करताना ‘मास्क घालायला विसरू नका, कोरोना आत्ताही येथे आहे- बुलबुल पांडा,’ असे त्याने लिहिले आहे.

 

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश  आणि जेनेलिया  या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जेनेलिया व रितेश दोघेही देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत आणि ब-याचदा ते मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच जेनेलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता.

ज्यात ती व रितेश रोमँटिक अंदाजात दिसले होते. या व्हिडीओला तासाभरात एक लाख ऐंशी हजाराहून जास्त लाइक्स मिळाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here