मुंबई : मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंनी पक्षप्रवेश केला होता. मी ४० वर्ष भाजपमध्ये काम केल आहे. माझ्यावर अन्याय झाला असे म्हणत राष्ट्रवादीत गेले.
आता त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हातावर घड्याळ बांधले आहे, आता या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला महिला नेतृत्त्व मिळणार आहे.
आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी एका नवीन राजकीय वाटचालीस सुरुवात केली आहे. रोहिणी खडसे यांच्यामुळे उत्तर महाराष्ट्रात महिला संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी रोहिणी खडसे यांनी “मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती” असा आरोप केला.
रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया देताना, “मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली
काही दिवसांपूर्वी रोहिणी खडसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर नवा फोटो शेअर केला होता. यामध्ये त्या मनगटावरील घड्याळाकडे बघताना दिसतात.
राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचा फोटो ठेवत त्यांनी एकप्रकारे आपली पुढील राजकीय वाटचालच सांगितली आहे.
तसेच रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मीही भाजपला राजीनामा देऊन राष्ट्रवादी साठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर फोटो शेअर केलेल्या फोटोवरून हे अजून स्पष्ट झाल होत.
भाजपमध्ये माझ्यावर प्रचंड अन्याय होत असताना मी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ हि गोष्ट घातली तेव्हा भाजपच्या वरिष्ठांनी सांगितले तुम्हाला पक्षात संधी नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. आता मी मोकळा श्वास घेत आहे.
मी भाजपात असताना माझ्यावर अनेक चौकश्या लावण्यात आल्या होत्या. माझी अगदी ईडी चौकशी करण्याचीही मागणी स्वपक्षीयांनी केली होती पण आता त्यांनी ईडी लावली तर मी त्यांच्यामागे सीडी लावेल लावेल असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना दिला होता.
बाईला समोर ठेऊन मी राजकारण करत नाही, असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना देवेंद्र फडणवीसांवे लगावला होता.
एकनाथ खडसे भाजपात असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर मोठे गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना फडणवीसांचे बळ होते असा आरोप अनेकदा एकनाथ खडसेंनी केला होता.
सर्वांना प्रतीक्षा रोहिणी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची होती. एकनाथ खडसे यांच्यानंतर रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आता उत्तर महाराष्ट्रात कोणते राजकिय समीकरण तयार होते, याची उत्सुकता आहे.