मुंबई- करिना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई- बाबा होणार आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नंतर चाहते त्यांच्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत.
गरोदरपणात करिना सोशल मीडियावर विशेष सक्रीय आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यातले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतेच, शिवाय खासगी आयुष्यातली झलकही ती दाखवत असते.
स्वतः सैफ अली खान पुन्हा बाबा होण्यासाठी उत्साही आहे. आता त्याने करिनाची डिलिव्हरी कधी होईल, हेही सांगितलं आहे.
दुसरं मूल म्हणजे जबाबदारी पण ..
करिना कपूर आणि सैफ अली खान यांनी सोशल मीडियावर दुसऱ्यांदा पालक होण्याची बातमी शेअर केली. यानंतर तैमुर मार्च महिन्यात मोठा भाऊ होईल असं म्हटलं गेलं होतं.
आता स्वतः सैफने खुलासा केला की फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच एक छोटा पाहुणा त्यांच्या घरी येईल. सैफने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, दोघेही यासाठी खूप उत्सुक आहेत. दुसरं मुल ही मोठी जबाबदारी आहे. यासोबतच थोडी भीतीही वाटते.
करिनाचे बेबी बंपचे व्हिडिओ झाले व्हायरल
दरम्यान, करिना कपूर आपल्या कुटुंबासोबत नव्या घरात शिफ्ट झाली आहे. त्यांचं हे नवीन घर तैमुर आणि दुसऱ्या बाळाच्या सोयी लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे.
करिनाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे योगसाधना करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. तिचे हे फोटो अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. पहिल्या गरोदरपणातही करिना एवढीच सक्रीय होती.