लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व उदगीर येथील साखर कारखान्यांची खरेदी विक्री चौकशीच्या रडारवर : आ.संभाजी पाटील निलंगेकर

1235

सहकाराच्या नावावर स्वाहाकार करुन शेतकर्‍यांना लुटण्याचे, लुबाडण्याचे पाप ज्यांनी केले आहे. त्यांचे पाप आणि प्रताप उघडे पडणार आहेत.

लातूर : राज्यातील साखर कारखानदारीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. आता त्यांची चौकशी केली जात आहे.

लातूर जिल्ह्यातही साखर कारखानदारीत अनेक ‘महा’घोटाळे असून आता उदगीर व अहमदपूर येथील कारखान्याचीही खरेदी विक्री चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे.

या चौकशीतून बरेच काही उघडकीस येणार असून सभासदांच्या व शेतकर्‍यांच्या पैशावर ज्यांनी दरोडा टाकला ते उघडे पडतील; असा गौप्यस्फोट माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

सहकाराचा स्वाहाकार करुन सहकार बुडवून आपली घरे भरली आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लातूर जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या पैशावर उभे असलेले सहकारी साखर कारखाने अक्षरशः ‘कवडीमोल’ किंमतीत खरेदी केलेले आहेत.

हे कारखाने आता ईडीच्या रडारवर आले आहेत. या कारखान्यांच्या खरेदी विक्रीची चौकशी होणार आहे. ज्यांनी हे पाप केले त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कारखाने स्वतःच्या स्वार्थासाठी खरेदी करणारे कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे त्यांच्या पापाचा घडा भरला असल्याचे आ.संभाजी पाटील म्हणाले.

शेतकर्‍यांच्या नावावर, शेतकर्‍यांचे शेअर्स घेवून सहकारी कारखाने उभे करण्यात आले होते. ते कारखाने जाणीवपूर्वक दिवाळखोरीत काढण्यात आले.

अतिशय धुर्तपणे वैयक्तीक मालमत्ता समजून आपल्याच कंपनी मार्फत आपल्याच बँकेच्या पैशाने सहकारी साखर खरेदी केले.

या लोकांनी हा व्यवहार करताना शेतकऱ्यांना विचारले ना सभासदांना विचारले. दोन्ही कारखाने गिळून टाकले आहेत.

करोडो रुपयांची मालमत्ता कवडीमोल किंमतीला विकत घेतली गेली. ही मालमत्ता विकणारे व खरेदी करणारे आता ईडीच्या सापळ्यात अडकणार आहेत.

सहकाराच्या नावावर ‘स्वाहाकार’ करुन शेतकर्‍यांना लुटण्याचे, लुबाडण्याचे पाप केले आहे. ते आता उघडे पडणार आहे.

लातूर जिल्ह्यात अहमदपूर व उदगीर तालुक्यातील साखर कारखाने अत्यंत चुकीच्या व मनमानी पद्धतीने खरेदी विक्री केले आहेत.

ते ‘सहकार महर्षी’ आता उघडे पडतील. या महाघोटाळ्यात गुंतलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उघडे पडतील, असा विश्‍वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

लातूर जिल्ह्यातील हे दोन्ही कारखाने ईडीच्या रडारवर आहेत. सहकारातून स्वतःच्या कूटूंबाची समृद्धी, कूटूंबाचा विकास झाला आहे. स्वत:ला सहकार सहर्षी, सहकार सम्राट म्हणून मिरवणारे नेते शेतकऱ्यांना फसवत आहेत.

जिल्ह्यातील साखरसम्राट कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटत आहेत ते सुद्धा या माध्यमातून उघडे पडणार आहे, तेव्हा शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा यांना सहजासहजी पचणार नाही, असेही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here