संभाजी पाटील निलंगेकर यांचा सरकारवर गंभीर आरोप : कृषी विभागातील ‘वाझे’ शेतकऱ्यांची लुट करीत असताना सरकार गप्प का?

422
संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई : महाविकास आघाडी सरकार वाजे प्रकरणात वादात सापडले असताना आता कृषी विभागातील ‘वाझे’ यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची वसूली सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. खाजगी कंपन्यांच्या आडून खत आणि बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे.

त्यामागे सरकारचे कृषी विभागातील ‘वाझे’ जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडी सरकार खासगी कंपन्यांचे दलाल म्हणून काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहिले तर शेतकऱ्यांना कसे फसविले गेले हे लक्षात येईल. खाजगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना अक्षरशः लुबाडले आहे.

मात्र हे सरकार फक्त मुंबई आणि वांद्रेपुरते मर्यादित आहे. या सरकारला शेतकर्‍यांच्या बांधावरील दुखः कळत नाही. शेतकऱ्यांना सरकारने आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही अशी टीका निलंगेकर यांनी केली.

केवळ शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली; पण गेल्या दोन वर्षात एक रुपयाही मिळालेला नाही. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात खासगी कंपनीवर सुमारे २०० कोटी रुपये खर्च झाले. निलंगेकर म्हणाले की, लातूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे.

सरकार पळून जाऊ शकत नाही

11 लाख क्विंटल पैकी केवळ 2 लाख क्विंटल बियाणे महाबीज देत आहेत. खासगी आणि सरकारी दरांमध्ये 1,500 ते 2000 रुपयांचा फरक आहे. पाटील म्हणाले की, जे सरकार फक्त मुंबईतून 100 कोटी रुपये वसून करीत होते; ते आता प्रत्येक जिल्ह्यात 200-200 कोटी रुपयांची वसुली करीत आहे.

कृत्रिम टंचाई निर्माण करणार्‍या कंपन्या खताऐवजी माती पुरवठा करीत आहेत. जेव्हा सरकारला या प्रश्नाचे जाब विचारण्यासाठी अधिवेशन आवश्यक होते, तेव्हा हे सरकार दोन दिवसांत संपूर्ण अधिवेशन गुंडाळत आहे,  खरे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतंत्र एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची गरज आहे.

तेव्हा सरकार अधिवेशनच 2 दिवसाचे घेत आहे, प्रत्येक समस्येपासून सरकार पळत आहे. सरकारचे धोरण फक्त चालढकल करण्याचे आहे.

अधिवेशनात आपल्याला उत्तर देता येणार नाही, याची जाणीव असल्याने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची टीकाही निलंगेकर यांनी केली. सोबतच सरकारच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here