पोलिओ लस म्हणून चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजले | बालकांची प्रकृती खालावली

262

राज्यभरात पोलिओ लसीकरणाची मोहिमे मोठ्या थाटामाटात राबवण्यात आली.

या दरम्यान यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

12 बालकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यवतमाळमध्ये 1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता.

त्यावेळी पोलिओ ऐवजी सॅनिटाझर पाजल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेमुळे 12 मुलांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घडलेल्या सर्व प्रकरणानंतर मंत्री बच्चू कडू यांनी संबंधित दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले, असल्याची माहिती दिली आहे.

बच्चू कडू ट्विट करत म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील कापसी कोपरी या आरोग्य केंद्रावर पोलीओऐवजी सॅनिटायझर पाजण्याचा प्रकार घडला.

या हलगर्जीपणा मुळे 12 लहान बाळांचे जिव धोक्यात आले.

स्थानीक प्रशासनास संपर्क करुन संबंधित दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, देशभरात पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.

मुलांना पोलिओ होऊ नये म्हणून दोन पोलिओचे दोन थेंब दिले जातात.

2 फेब्रुवारीपर्यंत देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे.

या मोहिमेंतर्गत मुलांना पोलिओ लस दिली जाते. 30 जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये काही मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here