नामदार संजय बनसोडे यांचा अजून एक धमाका : पंचायत समिती इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजुर

1007
Sanjay Bansode

उदगीरकरांना खरे तर विकास काय असतो याचा विसर पडला आहे. मागील दहा वर्षात विकासाची गाठभेट कधी झाली नाही. मागच्या दहा वर्षात जो काही विकास झाला असे सतत सांगितले जाते, तो निव्वळ वेळकाढूपणा होता.

अनेक वर्षांपासूनची एमआयडीसीची मागणी होती, पण हातात सत्ता असूनही कर्मदरिद्रीपणा करण्यात आला. पालिका ते पार्लमेंट सत्ता असताना फक्त शब्दांचे बुडबूडे उडविण्यात आले. त्यामुळे उदगीरच्या जनतेला थातूरमातुर कामांचे प्रझेंटेशन करुन वेळ मारुन नेण्यात आली.

उदगीरचा विकास केला तर आपल्याला शाप लागेल ही भीती सर्वपक्षीय नेत्यांना कायम सतावत होती. कोणताही प्रश्न फक्त निवडणूकीच्या जाहीरनाम्यापुरताच ठेवला गेला. कोणतीही निवडणूक आली की 1760 घोषणांचे 12 घड्यांचे पत्रक हातात द्यायचे, पण त्यातील एक आश्वासन करायचे नाही. हे जाहीरनामे म्हणजे नुसते बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी मात्र उदगीरकर कधी तृप्त झालाच नाही. सगळा शब्दांचा झोलझाल करण्यात वेळ वाया घालवत होते.

मात्र उदगीरकरांच्या मनात धाकधूक असली तरी नामदार संजय बनसोडे यांना संधी देण्याचे धाडस केले आणि संजय बनसोडे आमदार व नामदार झाले. त्यांनी उदगीरकरांना थेट विकासाच्या एक्सप्रेसमध्ये बसविल्याने आता गरगरायला लागले आहे. कारण एवढ्या वेगाची सवयच नाही, नुसत्या आश्वासनावर जगणारी उदगीर-जळकोटची भोळीभाबडी जनता! त्यांना विकासाने कायम चकवा दिला आहे. त्यामुळे तुमचा झपाटलेपणा कल्पनेपलिकडचा आहे.

एमआयडीसी मंजुर झाली, त्याबद्दल अभिनंदन म्हणून बॅनर लावले आणि ते काढायच्या आत प्रशासकीय इमारत मंजुर करुन घेतली. त्याचे बॅनर लावून थोडे निवांत बसावे म्हटले तर आता चक्क दहा कोटी रुपयांची पंचायत समितीची इमारत मंजुर करुन घेतली आहे. आता या वेगाने तुम्ही झपाटून काम करीत राहीलात तर आम्ही मागून मागुन काय मागांव हा प्रश्न निर्माण होईल, जरा आम्हाला विचार तर करु द्या!

आता तुम्ही मंजुर करुन आणलेल्या कामांची यादी तुम्हीच द्या, आम्हाला तर काही आठवत नाही व सुचतपण नाही एवढी कामं तुम्ही मंजुर करुन आणली आहेत. काही कामांची सुरुवात झालीय तर काही कामांना लवकर सुरुवात होईल. त्यामुळे उदगीरकर म्हणून आम्ही आता निवांत आहोत. कारण आम्ही आमचा कारभारी खर्‍या अर्थाने लायक निवडला आहे.

खरे तर तुम्ही नामदार झालात आणि कोरोना आला. महाराष्ट्र व राष्ट्र लॉकडाऊन असल्याचे कारण देवून तुम्ही स्वतःचा बचाव अगदी सहज करु शकला असता, पण अगदी झपाटल्यागत एकामागुन एक विकासकामं करताय, त्याबदद्ल तुमचे अभिनंदन केलेच पाहीजे, आणि उदगीरकर तुमचं मनोमन अभिनंदन करीत आहे.

नामदार साहेब, तुमचा आवाका एवढा असेल असे खरेच कोणालाही वाटले नव्हते. आम्हाला वाटले होते, निवडणूकीत गोडगोड बोलून आमदार झाल्यावर हा काही उदगीरला येत नाही. आला तरी आपल्यासाठी काही करणार नाही. तुम्ही तर आम्हाला विकासाच्या रोलर कोस्टरमध्ये बसवून मजा घेताय.

एक काम झाले की, दुसरे काम! एक मंजुरी झाली की दुसरी मागणी मंजुर! उदगीरकरांनी फक्त एक डोळा मागितला होता, तुम्ही तर डोळे, हात पाय सगळं देतायं. मग पुढच्या निवडणूकीसाठी काही शिल्लक आश्वासन राहणार आहे की नाही. आजवर नेत्यांनी कोपराला गुळ लावून मस्त सत्तेचे लाडू खाल्ले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एवढे लाडू खाल्ले की उदगीरकरांना अजीर्ण झाले.

उदगीरकर दरवेळी प्रयोग म्हणून बदल करत असतो. मात्र दूर्दैव असे की पहिलाच बरा म्हणायची वेळ आणत असतो. त्याला अपवाद तुम्ही ठरलात हे उदगीरकरांचे नशीब किंवा हाताला बर्‍याच वर्षांनी आलेलं यश म्हणा हवं तर ! नाही तर उदगीरकरांना हात दाखवून अवलक्षण करुन घ्यायची भारी हौस होती. एकापेक्षा एक नग उदगीरकरांनी पाहीले, पण विकासाचे तोंड काही पाहीले नव्हते.

तुम्ही एखादं काम मंजुर करुन आणलं की, हे तर माझ्या काळातील कामं आहे असे सांगितले जाते, त्यामुळे आम्हाला कामाची तारीख नाही तर काम करुन दाखतायं हे खुप महत्वाचं आहे. तुमच्या प्रयत्नांना यश येत आहे, उदगीरचा विकास होत आहे हे खुप महत्वाचे आहे.

निधी कसा येतोय, मंजुर कसा होतोय, त्याच्या तांत्रिक भानगडीत आम्हाला पडायचेच नाही. तुम्ही गतिमान विकास करताय हे महत्वाचे आहे. नामदार बनसोडे साहेब, आमच्या उदगीरसाठी तुम्ही जे करताय ते आमच्यासाठी अफाट आहे. तुमच्या हाताला यश यावं हीच अपेक्षा आहे. ऑल दि बेस्ट !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here