संजय राठोड कॅबिनेटमध्ये बसवायच्या लायकीचा नाही : चित्रा वाघ

169
chtra-wagh-sanjay-rathod

मुंबई : संजय राठोड प्रकरणात पोलिसांच्या तपासात संदिग्धता आहे. पोलीस दबावात काम करीत आहेत. 

तेव्हा या प्रकरणातील पुणे पोलिसांकडून तपास काढून इतर पोलिसांना तपास द्यावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 

पुणे पोलिसांनी आतापर्यंत अरुण राठोडची चौकशी केलीच नाही, अरुण राठोडची चौकशी केल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असा गंभीर आरोपही चित्रा चव्हण यांनी बोलताना केला.

संजय राठोड आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, हे गंभीर आहे. संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणात हत्यारे आहेत, असं म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ बोलताना म्हणाल्या की, “आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत मी पोलीस महासंचालकांची भेट घेतली.

या भेटीमागील महत्त्वाच्या विषय होता, तो म्हणजे पुणे पोलिसांची संदिग्ध भूमिका. जी अगदी पहिल्या दिवसापासून आहे. त्यामुळे आमचा यांच्या संपूर्ण चौकशी यंत्रणेवरच विश्वास नाही.

त्यामुळे महाराष्ट्रात एखादा सक्षम अधिकारी नेमणे गरजेचे आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून जे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले आहे. यामागे कोण आहे हा खरा प्रश्न आहे?

त्यानंतर ते फरार असल्याचं सांगितलं. चार दिवसांनी एक माहिती मिळाली की, त्यातला एक सापडला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, आज पुणे पोलिसांच्या ताब्यात एकही जण नाही.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या प्रकरणी त्यांनी ज्या लोकांना जुजबी चौकशी करुन सोडून दिले, ती मुले आज पुणे पोलिसांच्या ताब्यात नाहीत. एवढी मोठी घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष दर्शीना चौकशी करुन सोडून देण्याचे कारण काय?

पुणे पोलिसांना माझं आवाहन आहे की, जर तो अरुण राठोड तुमच्या ताब्यात असेल तर त्या सगळ्या 12 ऑडिओ क्लिप्स त्याच्या मोबाईलमध्ये असू शकतात. त्याव्यतिरिक्त इतरही डाटा त्याच्या मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे. तो तुम्ही रिकव्हर केला का?

ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्या सगळ्या संबंधित घटनेशीच होत्या. घटना घडल्यापासून ते तिचा मृतदेह रुग्णालयात घेऊन जाण्यापर्यंतचं हे संभाषण होते.

या ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचं संजय राठोड यांच्याशीच संवाद झाला आहे. मग पुणे पोलिसांना यासंबंधित कॉल लॉग अरुण राठोडच्या फोनमध्ये सापडला नाही का?, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

संजय राठोड याला चपलेनं झोडलं पाहिजे : चित्रा वाघ

बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आलेत. यातील एकाने आपलं मंत्रीपद वाचवले आता दुसऱ्याचे काय होते ते आपण पाहूयात. आपल्या आपल्या खुर्च्या तुम्ही वाचवल्या मग तुम्ही लोकांना काय उत्तर देणार?

राज्यातील मायभगिनींना तुम्ही काय उत्तर देणार? संजय राठोडला चपलेनं झोडले पाहिजे. आज त्याला कॅबिनेटमध्ये नेऊन बसवत आहेत. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातील जनतेमध्ये तुमची प्रतिमा वेगळी आहे.

तुमच्याकडे आम्ही आमच्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून पाहतो. एक संवेदनशील नेतृत्त्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. त्या हलकट माणसासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून कॅबिनेटमध्ये बसणार? याला कॅबिनेटमध्ये बसवायच्या लायकीचा नाही हा माणूस! असे होऊच शकत नाही की, या सगळ्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना नसेल.

तेव्हा याचे उत्तर तुम्हाला राज्याचा प्रमुख म्हणून दिले पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी संजय राठोड यांची तत्काळ हकालपट्टी करावी. स्वतः शेण खायचे आणि अख्ख्या समाजाला वेठीला धरायचे असे कितीही आले तरी आमचा आवाज गप्प करु शकणार नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here