राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण | अतुल भातखळकरांची टीका

115

भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने रविवारी समन्स बजावले. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

राऊतांच्या टीकेला भाजपा नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी आपल एक व्हिडिओ ट्विट करत खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, संजय राऊतांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण अशी होती असे म्हणत टीका केली आहे.

केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली.

दरम्यान, संजय राऊत यांनी आज (दि. २८) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आमच्यापैकी कुणीही काहीही चुकीचं केलं नाही, तुम्हालाच खाबरायला लागेल. जर कुणी नामर्दाग्नी करत असेल तर शिवसेना त्याच बद्दतीने उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.

मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला हादरे बसतील… तुमचं तोंड दाबलयं कुणी? उघडाना तोंड. जे मनात येईल ते बोला. तुमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही.

त्यामुळे संजय राऊत कर नाही त्याल डर असायचं कारण नाही. थेट पुरावे द्या, ईडीच्या नोटीशीला उत्तर द्या. भाजपावर हेतूवार आरोप करण्याचे धंदे व उद्योग बंद करा.

कंपाउंडरकडून औषध घेताय आता एमडी डॉक्टरकडून घ्या, म्हणजे तुमची मनस्थिती थोडी ठीक होईल. संजय राऊत आपल्या सवंग राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन करताय.

चांगले आहे लोकांना शिवसेनेची औकात कळते आहे, असंही एक ट्विट अतुल भातखळकर यांनी करत संजय राऊत यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.

बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे.

महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here