कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा लवकरच सुरु होणार; ICMR ने दिले संकेत

414
Good News | Schools from 9th to 12th will start in Pune from tomorrow

नवी दिल्ली: कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली शाळा आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा धोका कमी असल्याने मुलांची शाळा लवकर सुरू करणे अपेक्षित आहे.

प्राथमिक शाळा सुरू झाल्यानंतर माध्यमिक वर्गसुद्धा सुरू होतील. आयसीएमआरने शाळा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शाळा सुरू करण्याबाबत विचारले असता डॉ. भार्गव म्हणाले, “सुरुवातीला प्राथमिक शाळा सुरू केल्या जातील. कारण लहान मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी असतो.”

युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये या शाळा सुरू ठेवल्या होत्या. कोरोनाची परिस्थिती पाहून लवकरच प्राथमिक शाळा सुरू केल्या जातील.

डॉ. भार्गव म्हणाले की, लहान मुलांमध्ये विषाणूचा धोका कमी आहे. मुलांच्या फुफ्फुसांमध्ये एसीई रिसेप्टर्सची कमतरता असते.

जिथे व्हायरसचा हल्ला होतो. मुलांना संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. 6 ते 9 वयोगटातील मुलांमध्ये 57.2% अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

हे देखील वाचा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here