भाजपचे नेते गोपिचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टिका केली आहे.
शरद पवारांच्या हस्ते जेजरी येथील आहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणावेळी बोलताना शरद पवार यांनी आहिल्यादेवी होळकरांच्या जन्माचा दाखला रोहित पवार यांचा उल्लेख केला होता.
याच पार्श्वभूमीवर गोपिचंद पडलकरांनी ट्विट करत पवारांवर टिका केली आहे, “स्वयंघोषित ‘जाणता राजा’ उर्फ मा.शरदचंद्र पवार साहेबांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावलाय, त्यांनी चक्क त्यांचे ‘लाडके’ रोहित पवार यांच्या मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे विधान ‘जेजूरी गडा’वरून केले.
शरद पवारांची अहिल्यादेवींवरती किती आस्था आहे? ते यावरूनच अधोरेखित होते. म्हणूनच मी म्हणतोय, ‘ते आपला वापर फक्त राजकारण आणि फक्त राजाकारणासाठीच करतात. अशा या ‘प्रस्थापित’ राज्यकर्त्यांचा जाहीर निषेध… जाहीर निषेध’ अशा शब्दाच त्यांनी टिका केली.
दरम्यान, शरद पवार ज्या पुतळयाचे अनावरण करणार होते त्याच पुतळ्यापाशी जाऊन पडळकरांनी एक दिवस आधी जाऊन आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळी देखील त्यांनी “शरद पवार हे भ्रष्ट नेते आहेत त्यांचा हाथ आहिल्यादेवींना लागणं म्हणजे आहिल्यादेवींचा अपमान आहे” अशी टिका केली होती.