कुंदेवाडी : प्रेम, आकर्षण, सिनेमाचा प्रभाव, शिक्षक व विद्यार्थ्यांनीचे नाजूक नाते यात एक सुवर्णमध्य असतो.
शिक्षक व विद्यार्थ्यांनीच्या नात्यात गुंतागुंत निर्माण झाली की मग नको ते घडते, आणि हे पवित्र नाते कलंकित होते.
सविस्तर वृत्त असे की, पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात मुलगी शिकत होती.
विशेष म्हणजे पंकज श्याम साळवे (वय २३, रा. कुंदेवाडी, ता. निफाड) याच्याकडे ही मुलगी दुसरीत असल्यापासून शिकवणीला जात होती.
एकेदिवशी मुलगी अचानक घरातून निघून गेली. घरच्यांनी तिच्या खोलीत शोध घेतला तेव्हा एक चिठ्ठी सापडली.
त्या चिठ्ठीला पाहून घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली कारण चिठ्ठीत लिहिले होते.
सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे.
सातवीत शिकणाऱ्या मुलीच्या खोलीत सापडलेल्या या चिठ्ठीने संपूर्ण कुटुंब हादरून गेले.
मुलीच्या खोलीत तिच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी आढळली. “सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे.” असे त्या चिठ्ठीत नमूद केलेले होते.
खात्री करण्यासाठी मुलीचे कुटुंब साळवेच्या घरी गेले. तेव्हा घरच्यांनाही धक्का बसला.
कारण त्याच्या घराला कुलूप असल्याचे लक्षात आल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हंटले आहे.
बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असून, साळवे एका शाळेत हंगामी शिक्षक आहे.
तो देवपूर परिसरात दोनतीन ठिकाणी शिकवण्या घेतो. त्याच्या या प्रतापामुळे पालक हादरून गेले आहेत.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन साळवेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.