बारामती एमआयडीच्या कंपनीत ‘सेक्स रॅकेट’ | पोलिसांची धाड, एकाला अटक

222

पुणे: बारामती एमआयडीसीतील बंद पडलेल्या कंपनीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला अटक केली आहे. तालुका पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडीसीत एक कंपनी बंद पडलेली होती. या कंपनीच्या इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत तालुका पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी धडक कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. तर त्या ठिकाणी असलेल्या महिलेची यातून सुटका केली आहे. आरोपीने पैशांचे लालूच दाखवून या ठिकाणी आणले होते. त्याने जबरदस्ती या वेश्याव्यवसायात ढकलले असा आरोप महिलेने केला आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवला. बोगस ग्राहक आणि हा व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये बोलणी सुरू होती. त्याचवेळी पोलिसांनी तिथे छापा मारला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here