पुण्यातील उच्चभ्रू परिसरात सेक्स रॅकेट | 16 नायजेरियन तरुणींची सुटका

225
CRIME news

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा पथकाने सांगवी परिसरात सुरू असलेलं एक मोठं सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत 16  नायजेरियन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. पिटा कायद्या अंतर्गत केलेल्या कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी महिला आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे.

या परिसरात चार महिलांच्या मार्फत देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता 16 नायजेरियन तरुणी आढळून आल्या आहेत.

संबंधित महिला भारतात कशा आणल्या गेल्या याचा सध्या पोलीस तपास करत आहे. भर लोकवस्तीत परदेशी महिलांकडून अशा प्रकारे देह विक्रीचा व्यवसाय करून घेणारा मुख्य आरोपी कोण आहे, या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.

काही दिवसांपूर्वीच हिंजवडीमध्ये ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. ऑनलाईनच्या माध्यमातून ग्राहक शोधून महिला पुरवल्या जात होत्या.

या कारवाई 13 महिलांची सुटका करण्यात आली होती. एका वेबसाईटच्या मदतीतून हा सर्व व्यवसाय सुरू होता. त्यामुळे देहविक्री करणारे हायटेक झाल्याने पोलिसांनाहि अपडेट रहावे लागत असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here