शिक्षिका चालवायची सेक्स रॅकेट | सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले!

193

यवतमाळ : पोलिसांनी रविवारी रात्री धाड घालून दारव्हा रोड स्थित जसराणा अपार्टमेंटमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

हे सेक्स रॅकेटचक्क शिकवणी वर्ग घेणारी एका शिक्षिकाच चालवत असल्याची खळबळनजक माहिती समोर आली आहे.

जसराणा अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ठाणेदार धनंजय सायरे यांच्या पथकाला मिळाली.

त्यावरून पाेलिसांनी डमी ग्राहक बनून तेथे पाठवला. सोबतच शासकीय पंचही होते.

या डमी ग्राहकाने पाचशे रुपयांच्या तीन नोटा संंबंधित महिलेला दिल्या.

त्यानंतर त्या ग्राहकाने दबा धरुन बसलेल्या पोलिसांना सूचना दिली. घटनास्थळावर अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या.

कुंटणखाना चालवणारी महिला ही शिक्षिका असल्याचं सांगण्यात आलं.

तिलाही 17 वर्षांची मुलगी असून ही मुलगी घरात असतानाच देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याचं कळतंय.

दरम्यान, पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणारी आणि महिला रामकृष्णराव मस्के याला ताब्यात घेतलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here