लैंगिक छळ आणि अत्याचाराला वैतागुन, आईच्या प्रियकराची मुलीकडून हत्या !

666

आईच्या वासनांध प्रियकराने केलेला छळ सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने अखेर त्याला संपविले. या मुलीचा संताप इतका अनावर झाला की तिने मारलेल्या लाकडी दांड्याच्या एका दणक्यात आईच्या त्या प्रियकराने जीव सोडला.

आईच्या वासनांध प्रियकराला खूपदा समजावून सांगितले, त्याला खूपदा विनवणी केली. आपल्या आईपासून दूर रहावे असे अनेकदा विनवणी करून सांगितले. त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारही दिली, तरीही आईचा वासनांध प्रियकर सुधारत नव्हता.

त्याचा छळ आणि मनमानी वरचेवर वाढत होती, हा अत्याचार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने अखेर त्यालाच संपविले.

या मुलीचा संताप इतका अनावर झाला की तिने मारलेल्या लाकडी दांड्याच्या एका दणक्यात आईच्या ‘त्या’ प्रियकराने जीव सोडला. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावली येथे सोमवारी सकाळी हा थरार घडला आहे.

ज्ञानेश्वर गटकर (वय ६०) असे मृताचे नाव आहे. तो वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील ही सतरावर्षीय मुलगी सावली गावात तिच्या आईसह राहत होती. सध्या ती अकरावीत शिकत आहे. लहानपणीच तिचे वडील वारले. तिची आई सुरवातीला मोलमजुरी करीत होती.

त्याच दरम्यान तिच्या आईचे व ज्ञानेश्वरचे सूत जुळले. तिच्या आईने गरज व आधार म्हणून ज्ञानेश्वर सोबत अनैतिक संबंध ठेवले होते. त्यानंतर हा सावली येथील त्यांच्या घरी तिच्या आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.

त्याची वासना आई सोबत मुलीसाठी पण वाढत होती. काही महिन्यानंतर त्याची या मुलीवर वाकडी नजर होती. सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर दारू पिऊन घरी आला. त्याने परत एकदा या मुलीशी सलगी सुरू केली. मुलीने त्यावेळी बराच प्रतिकार केला. तरीही तो काहीही ऐकत नव्हता.

या सर्व अत्याचाराला आई विरोध करीत नाही आणि आईचा प्रियकर ऐकत नाही याचा राग मुलीला आला, तेव्हा अखेर मुलीचा संताप अनावर झाला. तिचा ज्ञानेश्वरशी वाद सुरू झाला. तिने त्याला रोखण्यासाठी खूप विनवणी केली पण तो ऐकायला तयार नव्हता.

अखेर तिने याच रागाच्या भरात लाकडी दांडा उचलून ज्ञानेश्वरच्या तोंडावर मारला. हा दणका एवढा जबरदस्त होता की, तो ज्ञानेश्वर घराच्या अंगणातच जागच्याजागी खाली पडला. त्यानंतर अधिक रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून या सतरावर्षीय मुलीला ताब्यात घेतले आहे.

विनयभंगाची शिक्षाही भोगली

विशेष म्हणजे २०१५ मध्ये मुलीने आईचा प्रियकर ज्ञानेश्वरविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. त्याच्यावर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पुढे त्याला शिक्षाही झाली होती.

फेब्रुवारीमध्ये तो तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये सावली येथे परतला आणि परत एकदा त्यांच्यासोबत राहू लागला. मुलीवर त्याची वाईट नजर आहे, याची कल्पना तिच्या आईला होती.

त्याचवेळी त्याला रोखले गेले असते तर ही घटना घडली नसती. मात्र इथे नीतीमत्ता गळून पडली होती. आईची अगतिकता आणि प्रियकराची वासना यातून हे भयानक कांड घडले, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here