राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टि्वट करून माहिती दिली. शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात नेण्यात आले.
एन्डोस्कॉपीनंतर शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार यांना काल संध्याकाळपासून पोटदुखीचा त्रास होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी सांगितले.