सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे. मात्र, युपीएच्या चेअरमनपदी शरद पवार यांना संधी मिळणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
भाजपाविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत असल्याचे सांगण्यात येत होते. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा होती.
केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मात्र शरद पवारांनी या बातम्यात काही तथ्य नसल्याचे सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे.
सध्या शेतकरी आंदोलनामुळे देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच दिल्ली मध्ये अनेक राजकीय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याचं वृत्त सगळीकडे पसरलं आहे.
विरोधी पक्षांची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते.
शरद पवार यांना एकमताने पंतप्रधानपदाच्या दाव्यासाठी समोर आणलं जाईल अशी शक्यता काही काँग्रेस नेत्यांच्या मागणीमुळे निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात भाजपला चकवा देत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात शरद पवार यांच्यासोबतच महत्वाचा वाटा असलेले शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या विषयावर भाष्य केलं आहे.
‘राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्ये आहे.’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
यासोबतच, ‘भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही. मात्र, देशभरातील विरोधकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर करावे’ असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
त्यामुळे, केंद्रीय राजकारणातही शरद पवारांकडे नेतृत्व देत भाजपाला आव्हान उभारण्याचा प्रयत्न युपीएतील घटक पक्षांचा आहे. त्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे.
शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे.
सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे.
जर शरद पवारांनी युपीएचे अध्यक्षपद स्वीकारले तर देशाचे राजकीय समीकरण नव्याने मांडले जाईल असे राजकीय तज्ञांचे मत आहे.