मेंढपाळाच्या मुलाने पुतळ्याचे उद्घाटन केले तरीही शरद पवारांनी स्वत: उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला?

242

जेजुरी : शरद पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी इतकेच आदर व धनगर समाजाबद्दल प्रेम आहे तर त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील (ST Reservation) आरक्षण का मिळवून दिले नाही, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

तुम्ही 50 वर्षे सरकारमध्ये होता, मग ही गोष्ट का जमली नाही. आतादेखील तुम्ही राज्यात सत्तेत आहात. तेव्हा धनगर समाजाला ST प्रवर्गाचे आरक्षण देणे तुम्हाला का जमत नाही, अशी विचारणा सदाभाऊ खोत यांनी केली.

ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला.

राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी तळागाळातील लोकांसाठी काम केले. जर मेंढपाळाच्या मुलाने त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर शरद पवार यांनी स्वत:च्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला? हा मुद्दा केवळ पुतळ्याचा उद्घाटनाचा नाही.

धनगर समाजाला फसवले गेल्यामुळे तो संतप्त झाला आहे. हीच फसवणारी माणसं आमच्या दैवताचं गुणगान गाणार असतील तर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे वेडे पीर दोन हात करायला उभे राहतील, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

‘आता सत्तेत आहात तर धनगर समाजाला आरक्षण का देत नाही?’

गेल्यावेळी भाजपची सत्ता होती तेव्हा धनगराच्या वेषात येऊन आरक्षण द्या, अशी मागणी करत होतात. मात्र, आता राज्याची सत्ता या लोकांच्या हातात आहे.

तेव्हा धनगर समजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे (ST) आरक्षण द्यावे, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना लगावला आहे. त्यांनी अजून दोन-चार पुतळे उभे करावेत आणि त्यांचे उद्घाटन करावे.

त्यासाठी कोणीही नाही म्हणालेले नाही. काल गोपीचंद पडळकरांनी केले, आज शरद पवारांनी उद्घाटन केले, उद्या दुसंरे कोणीतरी करेल, असेही खोत यांनी म्हटले.

मराठा-धनगर एकत्र आल्यास, दिल्ली काबीज होईल : जानकर

मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी काबीज करु शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केले.

महादेव जानकर यांनी हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे हेदेखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन महादेव जानकर यांनी राजकीय फटकेबाजी केली. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत.

धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे महादेव जानकर यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here