जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते अनावरण

190

जेजुरी : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या 12 फुटी पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. 

गडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमातून गडावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं पवारांच्या हस्ते अनावरण झाले. जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर, खासदार छत्रपती संभाजीराजे, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप , रोहित पवार, अशोक पवार आणि इतर नेते उपस्थित होते.

पुतळ्याच्या अनावरण वादावरुन जेजुरीमध्ये कमालीचा फौजफाटा तैनात

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन काल पहाटे चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले.

यानंतर पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

पुतळ्याच्या अनावरणाला मिळालेलं वादग्रस्त वळण पाहता, जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here