पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
शरद पवार आणि सरकार यांची तबीयत बिघडलेली तबीयत याचा संबंध नाही, असेल तर तो योगायोग नसावा असे विधान करून सूचक ‘राजकीय निदान’ पाटील यांनी केले आहे.
मात्र यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य करून नेमके ‘राजकीय निदान’ केले आहे.
पाटील म्हणाले की, सरकार टिकेल हे तुम्हाला का सांगावे लागते. जेव्हा असे सांगावे लागते, तेव्हा काही तरी गडबड आहे; हे समजून जायचे असते.
आजारी नसलेल्या माणसाला तो आजारी नाही हे सांगावे लागत नाही. तो ठणठणीत असल्याचे दिसून येते असे सांगतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत बिघडली हे माहीत आहे. परंतु सरकारचे मला माहीत नाही.