जावयाच्या प्रेमात पडलेली सासू कर्नाटकातून पळून पुण्यात आली होती. त्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले होते.
विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समाजात घडत असतात. नात्यातील विवाहबाह्य संबंध अनेकदा उशिरा समाजापुढे येतात. काही वेळा नात्यातील पावित्र्याला काळिमा फासून वासनेच्या खेळाचा अंत जीवघेणा ठरतो.
अशीच एक नात्याला व त्याच्या पावित्र्याला काळिमा फासणारी घटना पुण्यातील बिबवेवाडीमधून समोर आली आहे. एका जावयाने अनैतिक संबंधातून त्याच्या सासूची गळा दाबून हत्या केली.
विशेष म्हणजे या सासूचे तिच्या जावयासोबतच अनैतिक संबंध होते आणि त्याच्या नादी लागल्यानंतर तिने चक्क घर सोडून जावयासोबत घरोबा केला होता.
जावयाच्या प्रेमात पडलेली सासू कर्नाटकातून पळून पुण्यात आली होती. त्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले होते. काही दिवस सुरळीत गेल्यावर दोघात सतत वाद होत होते.
सासूची कटकट व त्रासाला वैतागुन जावयाने हे भयंकर कृत्य केले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
कर्नाटकातून जावयासोबत पळून आलेल्या ४५ वर्षीय मृत महिलेचे नाव अनारकली महमद तेरणे असे आहे. ती मूळची बेळगाव (कर्नाटक) ची रहिवाशी आहे. मागील काही दिवसांपासून आपल्या २५ वर्षीय जावई आसिफ आतारसोबत बिबवेवाडी परिसरात राहत होती.
काही दिवसांपूर्वीच आसिफचे मृत महिलेच्या मुलीसोबत लग्न झाले होते. नव्या जोडप्याचे सगळे काही आनंदात सुरू असताना जावई आणि सासू यांच्यात ‘जवळीक’ वाढली आणि त्यांच्यात अनैतिक संबध सुरु झाले.
सासूचे जावयावर प्रेम जडले, हे प्रेम इतके डोक्यात गेले होते की, सासू आणि जावयाने पळून जाण्याचा निर्णय घेतला. आपले अनैतिक नाते पुढे सुरू ठेवण्यासाठी व एकत्र राहून भावी आयुष्य एकत्र घालविण्याच्या उद्देशाने बेळगाव सोडून थेट पुण्यात आले.
दोघांनी समाजाचा विचार केला नाही. आरोपी आसिफने पत्नीचा केला नाही आणि सासूने स्वत:च्या मुलीचा आणि तिच्या भावी आयुष्याचा विचार केला नाही.
आपल्या अनैतिक नात्यावर विश्वास ठेवून दोघेही बेळगावहून पळून पुण्यात आले आणि बिबवेवाडी परिसरात ते राहू लागले. आसिफ मजुरीचे काम करत होता. बरेच दिवस दोघांमध्ये सगळे काही सुरळीत होते. मात्र काही दिवसांनी दोघांच्या डोक्यातील प्रेमाचे भूत एकमेकांना अडचणीचे ठरू लागले.
मात्र काही दिवसातच वेगवेगळ्या कारणांनी दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. जावई आसिफ या रोजरोजच्या वादाला कंटाळला होता. त्याला या बंधनातून मोकळे व्हावे असे वाटू लागल्याने अखेर या जावयाने सासूची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यावर तो फरार झाला.
मात्र पळून गेल्यावर आरोपी आसिफने एक चूक केली. त्याने पळून जाताना त्याच्या एका मित्राला सासूची हत्या केल्याचे सांगितले. आसिफच्या मित्राने हा प्रकार लगेच पोलिसांना सांगितला. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी लगेच कारवाई केली. कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आसिफला पोलिसांनी अटक केली.