प्रेम प्रकरणातून ती बॉयफ्रेंड सोबत फरार झाली | कुटुंबियांनी साईंच्या शिर्डीची बदनामी केली

153

अहमदनगर : शिर्डीतील महिला मिसिंग प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

तीन वर्षांआधी दिप्ती सोनी नावाची महिला शिर्डीमधून बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं.

पण आता या महिलेचा शोध लावण्यात पोलीस पथकाला यश आलं आहे.

तीन वर्षांआधी दिप्ती सोनी नावाची महिला शिर्डीमधून बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं.

पण आता या महिलेचा शोध लावण्यात पोलीस पथकाला यश आलं आहे.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

साडेतीन वर्षांपूर्वी शिर्डीच्या इंदूरमधून दिप्ती सोनी बेपत्ता झाली होती.

यानंतर पती मनोज सोनीने तात्काळ उच्च न्यायालयात धाव घेत तक्रार नोंदवली होती.

यानंतर पोलीस पथकाकडून जागोजागी दिप्ती सोनीचा शोध घेण्यात आला होता.

पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. यामुळे न्यायालयाने चक्क मानव तस्करी बाबत चिंता व्यक्त केली होती.

तब्बल साडेतीन वर्षांनी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येच दीप्ती सापडली आहे.

प्रियकर ओमप्रकाश चंदेलसोबत दिप्ती निघून गेल्याचा शिर्डी पोलिसांनी खुलासा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहापुर्वी दिप्ती आणि चंदेलचे प्रेमसंबध होते.

पण इच्छेविरुद्ध तिचा विवाह मनोज सोनीसोबत झाला, पण प्रेमासाठी दिप्तीने पळून जाण्याचा निर्णय घेतला.

या घटनेमुळे मनोज सोनी यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

आपली पत्नी बेपत्ता झाली म्हणून मनोज यांनी तिला शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते.

आजच्या धक्कादायक माहितीनंतर सोनी कुटुंबियांना मनस्ताप झाला असून असून ह्या सर्व प्रकरणात साईंच्या शिर्डीची बदनामी या जोडप्यामुळे झाली आहे.

स्मृतिभ्रंशाचे नाटक 

हनुमान गाथा सांगणाऱया चंदेल याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी वारंवार विचारणा केल्याने आपण यात फसू, असे त्याला वाटले. त्यामुळे चंदेल याने दीप्तीला स्मृतिभ्रंश झाल्याचे नाटक करायला सांगितले.

त्याने तिला तिच्या बहिणीच्या गल्लीत आणून सोडले. त्यानंतर तिला पतीने शिर्डी पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी तिला संभाजीनगर उच्च न्यायालयात हजर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here