शिरूर ताजबंद येथील कै. मोहनराव पाटील कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात

481
  • शिरूर ताजबंद येथील कै. मोहनराव पाटील कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात

  • आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली पाहणी

अहमदपूर : गेल्या काही दिवसांपासून अहमदपूर मतदारसंघातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे.

तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत अशा रूग्णांची संख्या अधिक आहे.

काही कोरोना बाधित रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवाने त्यांचे मृत्यू होत आहेत. आमदार बाबासाहेब पाटील यांनी गेल्या आठवडयात तालुक्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन कॉलेजच्या वसतिगृहाची जागा देऊन कै.मोहनराव पाटील आयुर्वेदीक कॉलेजच्या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटरचे काम सुरू करण्याबाबत सूचना दिली होती.

हे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याची पाहणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज केली. यामध्ये ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

या नविन कोविड सेंटरमुळे या भागातील कोरोना बाधीत रुग्णांची सोय होणार आहे. या कोवीड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असुन कोवीड सेंटर मध्ये 50 सर्वसुविधायुक्त बेडची सोय असणार आहे.

येथील सर्व कामे पुर्ण झाली असून सध्या इमारतीत सोयी सुविधा उपलब्धता, अग्निशमन आणि विद्युत विभागाचे परीक्षण चालू आहे. वैद्यकीय स्टाफ ही लवकरच उपलब्ध होईल.

1 मे महाराष्ट्र दिनी कोविड सेंटर सुरू करण्याचा आमदार बाबासाहेब पाटील यांचा प्रयत्न आहे. यावेळी धन्वंतरी आयुर्वेदीक कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्ता पाटील, तलाठी शाम कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here