शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला, आता शिवभोजन थाळीची वेळ आणू नका : संजय राऊतांचा इशारा

218
Sanjay Raut's warning

मुंबई : काल भाजपचे काही लोक शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी राडा करणाऱ्यांना शिवप्रसाद दिला आहे.

हा मुद्दा फक्त प्रसादापुरताच मर्यादित राहिला पाहिजे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नये, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

 शिवसेना-भाजप राडा प्रकरण

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राममंदिराच्या मुद्यावरून शिवसेना भवन येथे मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली आहे.

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत संजय राऊत यांनी हा इशारा दिला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहे. हुतात्मा चौक आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे. मराठी माणसाचा मानबिंदू आहे.

आपल्यात राजकीय मतभेद असू शकतात. पण शिवसेना भवन ही मराठी माणसाची ओळख निर्माण करणारे श्रद्धास्थान आहे. बाळासाहेब ठाकरे यांची ती वास्तू आहे.

शिवसेना भवनवर मोर्चा काढण्याचे कारण काय? भाजपावाले वाचू आणि लिहू शकतात, तुमचा शिक्षणाशी काही संबंधित आहे का? आपण सामना काळजीपूर्वक वाचला असता तर हि वेळ आली नसती.

Shivsena bjp activist clash

आम्ही केलेले आरोप काळजीपूर्वक वाचा. आमच्या प्रवक्त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. आरोपांची चौकशी झाली पाहिजे. जर हे आरोप द्वेषामुळे केले गेले असतील तर आरोप करणार्‍यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असे संपादकीय म्हणते. तेव्हा तुम्हाला का मिरच्या झोंबत आहेत असा सवालही केला आहे.

माहिती विचारणे हा गुन्हा आहे का?

आम्ही थेट भाजपावर कुठेही आरोप केलेला नाही. हा घोटाळा भाजपाने केल्याचे म्हटले नाही. राम मंदिराचा ट्रस्ट स्वायत्त आहे. त्याचे सदस्य कोणत्याही पक्षाचे नाहीत. तेव्हा कोणाला काही शंका असेल तर प्रश्न विचारू नये का?

 राम मंदिर जमीन घोटाळ्यावरुन सेना भवनासमोर राडा

ट्रस्टला काही प्रश्न विचारल्यास त्याची उत्तर त्यांनी का देऊन नयेत? ट्रस्टला प्रश्न विचारला तर भाजपाला का मिरच्या झोंबत आहेत, हा खरा प्रश्न आहे. या देशात माहिती विचारणे हा गुन्हा आहे काय ?; असा प्रश्न त्याने विचारला आहे. प्रश्न विचारणे गुन्हा असेल तर भाजपाने तसे जाहीर सांगावे.

काल हल्ला करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. मला वाटते हा विषय फक्त प्रसादापुरता मर्यादित रहावा. शिवभोजन देण्याची वेळ येऊ देऊ नये, शिवभोजन हवे असेल तर पुन्हा खुशाल यावे, अशी बोचरी टीका देखील केली आहे.

आरक्षणासाठी राष्ट्रीय धोरणाचा निर्णय घ्या

खासदार संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बैठक होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे दोघेही नेते एकत्र येऊन चर्चा करीत आहेत. चर्चा होणे गरजेचे आहे, कारण आरक्षणाचा मुद्दा हा एक नाजूक आहे. या समस्येतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चर्चा आहे. प्रत्येक जात व काही गट आरक्षणाची मागणी करीत आहेत. आरक्षणावरील राष्ट्रीय धोरणाबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

त्या बद्दल माहित नाही, कसे बोलू?

दरम्यान, एनआयएने एनकाउंटर तज्ज्ञ प्रदीप शर्माला अटक केली आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, “मला माहिती नाही, गृहमंत्री, पोलिस आयुक्त या संदर्भात बोलू शकतील, मला माहित नाही, ते मी कसे बोलू?”राऊत यांनी त्यावर काही बोलण्यास नकार दिला.

हे देखील वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here