शिवसेना विभागप्रमुखांनी अजानची बरोबरी महाआरतीसोबत करून टाकली.
मुंबई : शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धेचे आयोजन केले आहे. अजान मुळे सर्वांना मन:शांती मिळते, असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
त्यामुळे अजानची गोडी लहान मुलांना लागावी यासाठी या स्पर्धेेचे आयोजन केल्याचे, पांडुरंग सपकाळ यांनी सांगितले आहे. या स्पर्धेमुळे सेनेवर चौफेर टीका होऊ लागली आहे.
‘मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून त्याचे अजानचे मला नेहमीच अप्रूप वाटत राहिले आहे’, असे सपकाळ म्हणाले.
एवढेच नव्हे तर, शिवसेना विभागप्रमुखांनी अजानची बरोबरी महाआरतीसोबत करून टाकली. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केल्याचे म्हणटले आहे.
शिवसेनेने या आयोजनासाठी चांगल्या प्रतिसादाचीही अपेक्षा केली आहे. या संपूर्ण स्पर्धेचा खर्चही शिवसेनाच करणार आहे.
दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्तेसाठी शिवसेनेचे स्वरूप बदलत असल्याची टीका केली आहे. ‘कहर म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा दाखला अजानसंबंधी देण्यात आला आहे.
त्यांनी सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेच्या मूळ आचारविचाराला तिलांजली देणारी वाटचाल सुरू केली आहे. सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून भूमिकेची सरमिसळ केल्याचे असे दरेकर म्हणाले.