शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नितीन राऊत यांचा ‘गेम’ केला | माजी मंत्री लोणीकर

168

परभणी : राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफीची घोषणा केली होती, परंतु त्यांनी घूमजाव केले. यावरून सरकार विरोधी आंदोलने केली जात आहेत. आता या वादाला माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी नवे वळण दिले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा गेम केल्यामुळे नितीन राऊत (Nitin Raut) यांना आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव करावे लागले, असा दावा माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केल्याने महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.

महाविकासआघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बबनराव लोणीकर यांनी रविवारी परभणीत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाविकासआघाडीने वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केलेली नाही.

हे सरकार नापास झाले आहे!

फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार ही योजना लोकप्रिय होती. पण महाविकासआघाडी सरकारने ती बंद केली.

स्थानिक लोकप्रतिनिधी फडणवीसांना विरोध करत असले तरी उद्घाटनाचे नारळ फोडताना आनंदी होते. या योजनेचं नाव बदलून ती सुरु ठेवायला हवी होती. पण तसे या सरकारने केले नाही. यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ कमी झाला असता, असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले.

राज्यात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. सध्याच्या सरकारमध्ये अनेक मराठा नेते मंत्री आहेत. राज्याच्या अनेक भागात मराठा नेत्यांच्या शिक्षणसंस्था आहेत. तरीही आजवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही.

मुख्यमंत्री सहायता निधीतून होणाऱ्या मदतीचे वाटपही बंद आहे. यासाठी सहायता कक्ष नेमण्यात आला होता. या कक्षाकडे अनेक फाईल्स आल्या होत्या. यापैकी अनेकांना शासनाकडून मदतच मिळाली नाही, असेही लोणीकर यांनी सांगितले.

भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्याच्या घरावर बेकायदेशीर धाड टाकणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी चांगलीच खरडपट्टी काढल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे.

पोलिसांना दमदाटी करताना या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विधानसभेत उलटं टांगण्याची भाषा वापरली. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here