मुंबई : शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधात आंदोलनांची नौटंकी करण्याऐवजी राज्य सरकारने कर कमी करावेत, अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिवसेनेकडून इंधन दरवाढीविरोधात उद्या (दि.५ शुक्रवार) राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी टिका केली आहे.
शिवसेनेकडून इंधन दरवाढीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देताच माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली.
-
हिंदुत्व फक्त भाषणातून नसतं, असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही हिंदूत्व का सोडलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलन करण्याऐवजी सरकारने स्टेट टॅक्स कमी करावेत. ते सोडून आंदोलनाची नौटंकी करू नये, अशी टीका सरकारवर केली आहे.
एल्गार परिषदेत समाजात तेढ निर्माण करण्याचं काम झालं. एल्गार प्रकरणी सरकारची बोटचेपी भूमिका घेत असल्याच टीका फडणवीस यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली आहे.