धक्कादायक : 10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून बलात्कार, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल!

213
Crime News: Nurse accused of raping doctor on the pretext of marriage

रेवाडी : महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना वयाचे व नात्यांचे बंधन राहिलेले नाही.

70 वर्षांच्या आईवर मुलाने केलेले अत्याचार, 6 वर्षाच्या मुलीवर 50 वर्षाच्या नराधमाने केलेला अत्याचार पाहून नाते, वय आणि माणुसकीला अर्थचं उरला नाही असे वाटू लागते.

पालक व समाजाला विचार करायला लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 10 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेतील परिसरात 7 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

सर्वात चिंताजनक म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत. 24 मे रोजी हा सर्व प्रकार घडला होता. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हाट्सअप्पवरून पालकांच्या हाती लागल्यावर हा भयंकर प्रकार समोर आला. त्यानंतर संबंधित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नराधम अल्पवयीन मुलांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हाट्सअपवर पाठवला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ही दुर्दैवी घटना हरियाणामधील रेवाडीच्या रामपुरा पोलीस ठाणे परिसरातील आहे. संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी तिसरीच्या वर्गात शिकत आहे.

24 मे रोजी ती घराजवळच असलेल्या शाळेच्या मैदानात खेळत होती. त्या वेळी आजूबाजूला असलेल्या या मुलांनी तिला पकडून आडबाजूला नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारी मुले ही 8 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील एकजणच अठरा वर्षांचा आहे. इतक्या कमी वयाच्या मुलांनी बलात्काराचा गुन्हा केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. हा प्रकार करताना त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शूट केला होता.

त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ आपल्या काही मित्राना पाठवला होता. त्यांनी हा व्हिडीओ व्हॉट्सअपवरून व्हायरल केला. त्यानंतर हा सोशल मीडियावर फिरणारा व्हिडिओ जेव्हा मुलीच्या वडिलांना दिसला तेव्हा त्यांना जबर धक्का बसला आणि त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तातडीनं गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमधील दोघेजण हे संबंधित मुलीच्या कुटुंबातीलच आहेत आणि इतर शेजारी परिसरातील आहेत, असे रेवाडीचे डीएसपी हंसराज यांनी सांगितले.

हा व्हिडिओ नेमका कोणाच्या मोबाईलवर शूट झाला आणि तो कोणा-कोणाला पाठवला गेला आणि त्यांनी कोणाला शेअर केला आहे, याची पोलीस सध्या माहिती घेत आहेत.

या अल्पवयीन आरोपींची सध्या सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून अल्पवयीन मुलांनी केलेल्या या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here