आग्रा जवळील फिरोजाबाद येथील महिलेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे आणि त्यासंदर्भात पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महिलेने असा दावा केला आहे की सदरील स्वयंसेवक तिच्या घरी नेहमी येत असे, आणि एका दिवशी त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
ज्यानंतर तिने स्वतःला सोडवून घेतले आणि पुन्हा तिच्या घरी कधीही येऊ नको म्हणून सांगितले. त्यानंतर काही जणांनी तिच्या घरात जबरदस्तीने घुसून बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचाआरोप तिने केला आहे.
“तक्रार खरी असल्याचे आढळल्यास एफआयआर नोंदविला जाईल आणि आरोपीविरूद्ध कारवाई केली जाईल. तो आरएसएसचा स्वयंसेवक आहे की नाही हा दुय्यम विषय आहे आणि दोषी आढळल्यास त्याच्या खटल्यावर परिणाम होणार नाही.” असे ते म्हणाले.
तिची ओरडाओरडा ऐकून तिची नणंद तिच्या बचावासाठी आली, त्यानंतर तो मी आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचे सांगून ‘कोणीही काहीही करु शकत नाही’ असे सांगत तिथून निघून गेले.
त्या रात्रीच तिने पोलिसात तक्रार दाखल केली असली तरी पोलिस फक्त सकाळीच आले, असा आरोप या महिलेने केला आहे.
इंडियन टुडे टीव्हीने पोलिस ठाण्याचे प्रभारी रामेंद्रकुमार शुक्ला यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले की, महिलेकडून पोलिसांना लेखी तक्रार मिळाली असून तपास चालू आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजकुमार नगराथ म्हणाले की, आरएसएस स्वच्छ रेकॉर्ड असलेली राष्ट्रवादी संघटना आहे, तर संघटनेतील काही लोक संघाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा खुलासा केला आहे.