घरातील बंद खोलीत पती बलात्कार करीत असताना आरोपीच्या पत्नीने घराबाहेर उभे राहून पहारा दिला आहे.
रामपूर : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीची पत्नीही या अमानवीय कृतीत सामील असल्याचे समोर आले आहे.
जेव्हा बंद खोलीत बलात्कार चालू होता तेव्हा आरोपीची पत्नी घराबाहेर पहारेकरी म्हणून उभी होती. विशेषतः आरोपी पीडित मुलीच्या वडिलांचा चांगला मित्र आहे. पीडितेने तिच्या पालकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुलीच्या पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केली जात आहे.
उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे ही घटना घडली. गंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गल्लीत ही घटना घडली. होळीच्या दिवशी 14 वर्षीय पीडित मुलगी आपल्या आईसह शेजार्याच्या घरी गेली होती. पीडितेचे वडील व आरोपी चांगले मित्र होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचे जवळचे नाते होते.
होळी साजरी केल्यानंतर पीडित मुलगी तिच्या आईकडे जाण्यास गेली, परंतु आरोपीने तिला थांबवून घेतले. हिला आमच्याकडे काही दिवस राहू द्या असे म्हटल्यामुळे पीडितेच्या आईनेही आरोपीच्या शब्दाचा आदर केला, आणि मुलीला आरोपीच्या घरी ठेवले. कारण दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले कौटुंबिक संबंध आहेत.
जेव्हा पीडितेच्या आईने आरोपीच्या घरी आपल्या मुलीला सोडले, तेव्हा आरोपीच्या पत्नीने 14 वर्षीय मुलीला आपल्या पतीसह एका खोलीत बंद केले. येथे आरोपीने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बळी ठरविला.
त्यावेळी आरोपीची पत्नी घराबाहेर पहारा देत होती. बलात्कारानंतर आरोपी दाम्पत्याने पीडित मुलीला धमकावले आणि घटनेबद्दल कोणाकडे वाच्यता करू नको असे सांगितले.
मात्र पीडितेने घटनेच्या दोन दिवसानंतर रडत आपल्या आई-वडिलांना तिच्या सोबत घडलेले सर्व सांगितले. त्यानंतर, पीडित कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर पीडितेच्या कुटूंबाने पोलिसांना कळवले आणि आरोपी जोडप्यावर गुन्हा दाखल केला. यमन खान आणि रुमाना बेगम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.